लोकसभा निवडणूकीनंतर पवारांचे घर फुटणार:राम शिंदेंचे भाकीत

अहमदनगर |मी बारामतीमध्ये काल गेलो होतो कारण मला सावड फेडायची सवय आहे आणि बारामतीमध्ये जावून मी सावड फेडली आहे. लोसकभा निवडणूकी नंतर पवार कूटूबांत मोठा कलह होणार असून ते फुटणार आहे. हे मी भाकित करीत असल्याचे राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यानी वर्तविले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कर्जत येथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ सभा झाली .त्यावेळी राम शिंदे बोलत होते.

यावेळी खासदार दिलीप गांधी, आमदार सुरेश धस, राजेंद्र विखे, बबनराव पाचपुते, सेनेचे जिल्हाप्रमख राजेंद्र दळवी, नामदेव राउत, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, जिल्हाअध्यक्ष सुनिल साळवे, हे उपस्थित होते

शिंदे म्हणाले,मुख्यमंत्री यांनी राज्यात काॅग्रेस व राष्ट्रवादीमध्ये नेतेच शिल्ल्क ठेवले नाहीत. नगर जिल्हयात काॅग्रेसचे विरोधीपक्ष नेते आमच्या आजू बाजुने फिरत आहेत.

admin: