लोकसभा उपाध्यक्षपद हा आमचा हक्क आहे. एखादे मनोगत व्यक्त करणे म्हणजे नाराजी नव्हे: उध्दव ठाकरे

कोल्हापूर | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. निवडणुकीपूर्वी अंबाबाई चरणी मागितलेला नवस फेडण्यासाठी ठाकरे आपल्या नवीन खासदारांच्या समवेत कोल्हापूरला आले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी अंबाबाईंच्या दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, देवीच्या चरणी नतमस्तक व्हायला मी आलो आहे. तसेच कोल्हापूरकरांना त्यांनी मानाचा मुजरा घातला. यंदा कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा खासदार निवडूण आला आहे. कोल्हापूरकरांनी इच्छा पूर्ण केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानले. तसेच तुमच्या आशीर्वादाला तडा जाऊ देणार नसल्याचे ते म्हणाले.

जागावाटपाबाबद बोलताना आमचं सगळं ठरलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्रात अवजड खाते मिळाले. यावर आमची नाराजी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच लोकसभा उपाध्यक्षपद हा आमचा हक्क आहे. एखादे मनोगत व्यक्त करणे म्हणजे नाराजी नसल्याचेही ते म्हणाले. तसेच आम्ही हिंदुत्वासाठी युती केली असल्याचेही ते म्हणाले. तसेच अयोध्येला अधिवेशनाच्या अगोदर 16 जूनला जाण्याचा विचार असून याबाबत माहिती दोन दिवसात प्रसिद्ध करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

admin: