लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार, आणि नवा प्रदेशाध्यक्ष ही मिळणार

गेल्या अनेक वर्षांपासून अधिवेशन जवळ आले ही सुरू असणारी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा यावेळेस खरी ठरणार असे दिसू लागले आहे.महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी दिल्लीमध्ये दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

यावेळी त्यांना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावरील आरोपासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी यावर बोलणे टाळले. योग्य ती माहिती समोर येईल, प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात घाई करु नये, असे फडणवीस म्हणाले.  

एमपी मिल कंपाउंड प्रकरणातील कारभार पारदर्शक नसल्याच्या वृत्ताने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता अडचणीत आले आहेत. लोकायुक्त एम. एल. तहलियानी यांनी आपल्या अहवालात मेहता यांचा कारभार पारदर्शक नसल्याचा उल्लेख केल्याची चर्चा प्रसारमाध्यमात रंगली आहे. दिल्लीतील अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराशिवाय  केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर रावसाहेब दानवे यांच्या जागी  प्रदेशाध्यक्षपदी कोणची वर्णी लागणार यासंदर्भातील चर्चा होणे देखील अपेक्षित आहे. 

फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. विविध विषयांवर यावेळी चर्चा करतानाच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळालेली दुष्काळ निवारणासाठीची मदत आणि राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजना इत्यादींची माहिती यावेळी त्यांना दिली.

admin: