लॉकडाऊन-4 जाणून घ्या; काय सुरू अन काय बंद राहणार

31 मे पर्यंत या गोष्टी राहणार बंद बंद वाचा सवित्तर

सुरज गायकवाड

ग्लोबल न्यूज: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता लवकरच 1 लाखांच्यावर पोहचलेला दिसून येत आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने याबाबतची घोषणा केली.

केंद्र सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, पंजाब, तेलंगणानंदेखील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली.

त्यानंतर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागानं देशातला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवत असल्याचं जाहीर केलं. तिसऱ्या टप्प्याच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाणार आहे.

लॉकडाऊन 4.0 च्या नव्या नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा-कॉलेज बंदच राहणार आहे. तसेच मेट्रो-लोकल सेवाही बंदच राहणार असेही यात नमूद करण्यात आले आहे.

‘हे’ बंदच राहणार

1) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
2) मेट्रोसेवा बंद राहणार
3) शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
4) हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार
5) सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
6) विवाह, सोहळे, सभा-समारंभांवरील बंदी कायम

तसेच सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडिअम प्रेक्षकांविना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी काही नवे नियम करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सरकारांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन वगळता दोन राज्यं एकमेकांच्या सहमतीनं बसेस सुरू करू शकतात. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन निश्चित करण्याचे अधिकारदेखील राज्यांना देण्यात आले आहेत. सरकारी कार्यालयं सुरू राहणार असून त्या कार्यालयांमधलं कँटिनही सुरू असेल. याशिवाय संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू राहील.

ग्लोबल न्युज नेटवर्क: