उस्मानाबाद: कळंब तालुक्यात दोन तर भूम येथेही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

उस्मानाबाद– जिल्ह्यात आणखी ३ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळले आहेत. यात कळंब तालुक्यात २ तर भूम तालुक्यातील एकाचा समावेश आहे. जिल्हा शल्चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

यापूर्वी एकूण सात रुग्ण आढळून आले होते. त्यातील ३ जण बरे झाले होते. गेल्या आठवड्यात परंडा तालुक्यात १ आणि कळंब तालुक्यात ३ रुग्ण आढळून आले होते. आज कळंब तालुक्यातील दोघे जण बाधित आढळून आल्याने कळंब तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मात्र हि धोक्याची घंटा आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण ७९९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी उस्मानाबाद तालुक्यातील १६८, तुळजापूर १४५, उमरगा २०६, लोहारा ५२, कळंब १४५, वाशी ११, भूम १९, परंडा ५३ अशा व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे.

त्यापैकी ७४८ व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तसेच २८ व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. त्याचबरोबर १७ व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत. परंडा १, कळंब ३ व उमरगा २, येथील व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव्ह आलेले आहेत. लोहारा तालुक्यातील १ अहवाल मुंबई येथे तपासणी करण्यात आलेला आहे.

दरम्यान ७ रुग्णांपैकी उमरगा व लोहारा येथील ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत व २ रुग्ण उपजिल्हा रुग्णालय, कळंब येथे उपचार घेत आहेत तसेच १ रुग्ण परंडा येथील उपजिल्हा रुग्णालायामध्ये उपचार घेत आहेत. कळंब येथील १ रुग्णांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला सोलापूर येथे पुढील उपचारसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: