उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर लावणार मिळालेल्या मतांएवढी झाडे

ग्लोबल न्यूज नेटवर्क: पर्यावरणातील बदल आणि जागतिक तापमानवाढ ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे पर्यावरणूपरक उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. मी उस्मानाबाद या दुष्काळी भागातील जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो. मला लोकसभा निवडणुकीत 5 लाख 91 हजार 705 मतांचे आशीर्वाद जनतेनं दिले आहेत. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मी जितकी मते तितकी झाडे हा संकल्प राबवत आहे. त्यानुसार, मतदारसंघात 6 लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितले आहे.त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इतकेच नव्हे तर, लवकरच पावसाळ्याला सुरुवात होत आहे, त्यामुळे ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करणार आहे. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर, माझ्याप्रमाणे देशातील सर्वच नवनिर्वाचित खासदारांनी असा संकल्प केल्यास देशात पर्यावरणपूरक स्थिती निर्माण होऊन चांगले पर्जन्यमान होईल. असा सल्लाही त्यांनी दिला.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली असून यातउस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी विजय मिळवला. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पर्यावरण दिनी आपल्या फेसबुक पेजवर प्रसिध्द केलेल्या व्हिडिओ मधून झाडं लावण्याचा संकल्प बोलून दाखवला आहे.

admin: