रोहित पवारांनी घेतली ‘या’ पद्धतीने शपथ, सर्वांकडून होतेय कौतुक

मुंबई | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे नवे पर्व आता सुरू झाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूक पवार आणि ठाकरे घराण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. कारण पवार घराण्यातील तिसरी पिढी रोहित पवारांच्या रुपाने राजकारणात उतरली आहे. तर ठाकरे कुटुंबामधूनही पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंनी आमदारकीची शपथ घेतली आहे. रोहित पवारांनीही बुधवारी सकाळी आमदारकीची शपथ घेतली. मात्र आपल्या शपथविधीनंतर ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या शपथ घेण्याच्या पध्दतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

रोहित पवार पहिल्यांदाच विधानसभेवर निवडणून आले आहेत. त्यांनी अशा पध्दतीने शपथ घेतली की, सर्व जण त्यांच्याकडे बघत राहिले. सकाळी 8 वाजताच रोहित विधानसभेत दाखल झाले. विधानसभेच्या प्रवेशद्वारावरच आत्या सुप्रिया सुळे या सर्वांच्या स्वागताला उभ्या होत्या. रोहित पवारांचे त्यांनी हसतमुखाने स्वागत केले. रोहित पवारांनी त्यांचा आशीर्वाद घेतले आणि त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर ते विधानभवनात निघून गेले.

प्रमुख नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली. यानंतर रोहित पवार शपथ घ्यायला समोर आले. शपथ घेताना आधी आपले नाव घेऊन पुढील शपथ पूर्ण केली जात असते. त्याच पद्धतीन रोहित पवारांनी आपले नाव घेतले. पण त्यांनी वेगळ्या पध्दतीत शपथ घेण्यास सुरुवात केली. मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार, शपथ घेतो की…. या वाक्यानंतर विधानसभेतील सर्व सदस्य त्यांच्याकडे नजरा वळवल्या. इतर आमदार साधारण आपले व वडिलांचे नाव व आडनाव घेऊन शपथ घेतात. मात्र, रोहितने आईचेही नावमध्ये घेतल्याने त्यांचे कौतुक होते आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: