रेडीओवरुन शरद पवारांची शेतीबद्दलची ध्येयधोरणे ऐकली आणि राजकारणात येण्याचा निर्णय घेतला

मुळचा शेतकरी माणूस. वडीलोपार्जीत बक्कळ शेती. रेडीओवरुन शरद पवारांची शेतीबद्दलची ध्येयधोरणे ऐकली आणि राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. 35-40 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला. ते आजही पवारांच्या सोबत आहेत.

कुणी जागा द्यायला तयार नव्हते तर पाथरी शहराच्या कचरा डेपोला स्वतःची जमिन दिली. गल्ली बोळात काँक्रीटचे रस्ते आहेत. स्वच्छतेमुळे शहराला राज्यस्तरावर अनेक पुरस्कार मिळाले.

विकासकामांमुळे पाथरी नगरपरिषदेवर सलग तीन दशकांपेक्षा अधिक काळ त्यांचे वर्चस्व आहे. यंदा नगराध्यक्षपदावर त्यांनी मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य कुटूंबातील हिंदू मुलीला संधी दिली. त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से आहेत. त्यांच्या हातून समाजाची अशीच सेवा घडो. राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानीसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: