इंग्लंड ‘विश्वविजेता’, रोमहर्षक लढतीत न्यूझीलंड पराभूत,सुपर ओव्हर ही बरोबरीत

इंग्लंड ‘विश्वविजेता’, रोमहर्षक लढतीत न्यूझीलंड पराभूत

सुपर ओव्हर बरोबरीत, परंतु इंग्लंड विजयी

अखेरच्या चेंडूवर गुप्टिल बाद

एका चेंडूत 2 धावांची आवश्यकता

पाचव्या चेंडूवर एक धाव

दोन चेंडूत तीन धावांची आवश्यकता

चौथ्या चेंडूवर दोन धावा

तीन चेंडूत 5 धावांची आवश्यकता

तिसऱ्या चेंडूवर दोन धावा

चार चेंडूत 7 धावांची आवश्यकता

दुसऱ्या चेंडूवर सिक्स

पहिल्या चेंडूवर दोन धावा

पहिला चेंडू वाईड

गुप्टिल आणि निशम मैदानात

इंग्लंडच्या सुपर ओव्हरमध्ये 15 धावा, न्यूझीलंडपुढे 16 धावांचे आव्हान

बटलर आणि स्टोक्स मैदानात

दोन्ही संघाला 6 चेंडू खेळायला मिळणार

सामना बरोबरीत आल्याने वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये सुपर ओव्हर होणार

इंग्लंड आणि न्यूझीलंड अंतिम सामना बरोबरीत

इंग्लंडच्या 50 षटकात सर्व बाद 241 धावा

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर रंगत आहे. न्यूझीलंडने इंग्लंडपुढे विजयासाठी 242 धावांचे आव्हान ठेवले आहे. निकोल्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. इंग्लंडकडून वोक्स आणि प्लंकेटने प्रत्येकी 3 बळी घेतले.

अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्टिक गुप्टिल आणि हेन्री निकोल्स ही जोडी पुन्हा एकदा मोठी सलामी देण्यात अपयशी ठरली. 29 धावांवर न्यूझीलंडचा पहिला बळी गेला. गुप्टिलने बाद होण्यापूर्वी 19 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार केन विलियम्सन आणि हेन्री निकोल्स यांच्यात चांगली भागिदारी झाली. दोघांनी संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला. न्यूझीलंड भक्कम स्थितीत वाटत असताना प्लंकेटने विलियम्सनला 30 धावांवर बाद केले.

कर्णधार बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव कोसळला. विलियम्सनपाठोपाठ निकोल्सही अर्धशतकानंतर 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर टेलर (15) आणि निशम (19) झटपट बाद झाले. 173 वर पाच बळी गेल्यानंतर लेथम आणि ग्रँडहोमने संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. हाणामारीच्या षटकात ग्रँडहोम 16 धावांवर बाद झाला. त्यानंतर लेथमही अर्धशतकाच्या तोंडावर असताना 47 धावांवर बाद झाला. अखेर 50 षटकात न्यूझीलंडचा संघ 8 बाद 241 धावा करू शकला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: