राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाची सोशल मीडियावरील छायाचित्रे  ही राजकीय चकवा-जीवनदत्त आरगडे

बार्शी – माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडून सत्कार स्विकारताना सोशल मीडियावर व्हायरल झालेली छायाचित्रे व मजकूर हा विरोधकांना संभ्रमीत करण्यासाठीचा राजकीय गुगलीचा एक भाग होता असा खुलासा बार्शी  शहर कॉंग्रेस कमिटीचे  अध्यक्ष  अॅड. जीवनदत्त आरगडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

बार्शीची जागा ही कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने व राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून इच्छुक असलेले वैरागचे माजी सरपंच निरंजन भुमकर व माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद निंबाळकर यांच्यापैकी किंवा यांच्या शिवाय अन्य  कोणता उमेदवार द्यावा याबाबत चर्चा करण्यासाठी मित्र पक्ष म्हणून अजित पवार यांनी कॉंग्रेस पक्षाचे मत काय आहे विचारात घेण्यासाठी मला विचारणा केली होती.

 त्यावेळी   शिवसेना  भाजप मधून उमेदवारी साठी इच्छुक असलेले मात्र युतीकडे ही जागा शिवसेनेकडे गेल्याने तिकीट कापले गेलेले  माजी आमदार राजेंद्र राऊत यांना  आघाडीची उमेदवारी दिल्यास  आघाडीची एक जागा मिळवणे अधिक सोपे जाईल  असे मत मी मांडले होते. व या मतावर राष्ट्रवादी  पक्षातील  काही कार्यकर्ते  पदाधिकारी अनुकूल  होते , त्यामुळे माजी आमदार राऊत यांना  राष्ट्रवादी कडून  विविध पातळ्यांवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र माजी आमदार राऊत यांनी उमेदवारी स्विकारण्यामध्ये स्वारस्य न दाखवल्याने शेवटपर्यंत ही उमेदवारी अनिर्णित राहिली होती .

त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडे असलेले दोन्ही उमेदवारांचे पर्याय सोपल गटात बराच काळ काम केलेले चेहरे असल्याने याचा फटका सोपल यांच्या उमेदवारीला बसणार आहे  असा गैरसमज असल्याने राऊत यांच्या ही बाब पथ्यावर पडत असल्याचे चित्र तयार झाले होते, त्यामध्ये संभ्रम तयार करण्यासाठी राष्ट्रवादी  कॉंग्रेस कडे पर्यायी उमेदवार आहे असे भासविण्यासाठी माझ्या अनौपचारिक भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध  केली.

त्यामुळे ती  छायाचित्रे व प्रवेशाच्या बातम्या पूर्ण राजकीय चकवा करण्यासाठी राष्ट्रवादीने जाणीव पूर्वक दिल्या होत्या , मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्व मागितलेले नाही.  मी कॉंग्रेस पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी  व संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे व दोन्ही पक्षाची विचार धारा एकच असल्याने माझ्या पक्षांतराचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे माझ्या पक्ष प्रवेशाची बातमी ही बिन बुडाची आहे. असा खुलासा बार्शी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष अॅड. जीवनदत्त आरगडे यांनी केला.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: