भारताने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला 203 धावांनी धुळ चारली

नवी दिल्ली । टीम इंडियाने विशाखापट्टणम कसोटी जिंकली आहे. 395 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 191 धावांवर कमी झाला.

भारताकडून मोहम्मद शमीने पाच गडी बाद केले. यासह दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. तत्पूर्वी टीम इंडियाने 7 विकेट गमावल्यानंतर नाणेफेक जिंकून 502 धावा केल्या आणि पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा डाव पहिल्या डावात 431 धावांत आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला 71 धावांची आघाडी मिळाली.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाच्या माऱ्यासमोर आफ्रिकेची मात्रा चालली नाही. भारताने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला 203 धावांनी धुळ चारली. शमीने पाच बळी टीपले. त्याला जडेजाने उत्तम साथ देताना चौघांची शिकार केली.

अश्विनला एक बळी मिळाला. आफ्रिकेचा दुसरा डाव 191 धावांमध्ये आटोपला. आफ्रिकेचे शेपुट वळवळल्याने भारताचा विजय लांबला. उपाहारापूर्वीच भारताने विजय निश्चित केला होता.

रोहित शर्मानं पहिल्या कसोटीचा चौथा दिवस गाजवला… सलामीवीर म्हणून पहिल्याच कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी करणारा पहिला भारतीय, एका कसोटीत सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज, भारतीय खेळपट्टींवर सलग सात अर्धशतकी खेळी करणारा पहिला भारतीय… असे अनेक विक्रम रोहितने आज मोडले.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: