राज साहेब मला माफ करा, म्हणत मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या….!

राज साहेब मला माफ करा, म्हणत मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या….!

साध्य देशात विशेष करून राज्यात आत्महत्त्येचा सिलसिला काही थांबताना दिसत नाही. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी “पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आहे आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत” अशी सुसाईट न लिहीत मनसे शहराध्यक्षांनी आत्महत्या केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये राहणाऱ्या सुनील इरावार यांनी टोकाचे पाऊल उचलले.विशेष म्हणजे १५ ऑगस्टच्या दिवशी सुनील यांनी आपले जीवन संपविले आहे. तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहले आहे. तसेच, त्यांनी आत्महत्येपूर्वी अध्यक्ष राज ठाकरे व आपल्या संपूर्ण कुटुंबियांची देखील माफी मागितली आहे.

‘राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसे आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातंय आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळं मी माझं यापुढील जीवन माझ्या मनानं संपवत आहे. तरी माझ्यामुळं कोणालाच त्रास देऊ नका.’

‘आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा, मला माहित आहे मी मला माहितीय मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी, पण तुम्ही सर्व जण मला माफ कराल, अशी आशा बाळगतो, आई मला माफ कर- तुझाच सुनील. अखेरचा जय महाराष्ट्र.’

ग्लोबल न्युज नेटवर्क: