माढा लोकसभा मतदार संघात २००९ ची पुनरावृत्ती होणार,राष्ट्रवादी विजयी होणार-आ.भारत भालके

टीम ग्लोबल न्युज

पंढरपूर: २००९ साली मी जेव्हा विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात पंढरपूर विधानसभा निवडणुकीत उभा राहिला असताना जी परस्थिती होती तीच परिस्थिती आज माढा लोकसभा मतदार संघात संजयमामा शिंदे यांच्यासाठी पहायला मिळत आहे त्यामुळे मामा निश्चिंत रहा असा विश्वास पंढरपूर चे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी व्यक्त केला.

पंढरपूर येथे संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.ज्या वेळी मी २००९ ला विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळी माझ्या विरोधात गेली होती.परंतु न डगमगता मी त्याला सामोरे गेलो . शेवटी जनतेनेच ती निवडणूक हातात घेऊन भल्या भल्या प्रस्थापितांना धक्का देऊन मला मोठ्या मताधिक्याने विजयी केले होते.तीच परस्थिती आज माढा लोकसभेला संजय मामा शिंदे यांच्या बाबतीत आहे.मामा ही निवडणूक आता जनतेच्या हातात गेलेली आहे.
विजयसिंह मोहिते व सुधाकर परिचारक यांच्या भेटीवर बोलताना या दोघांचे नाव न घेता भालके म्हणाले , कोणी कुठेही जाऊ द्या.किती पण हातात हात घालून द्या.कोणी काहिही करु द्या.आता जनता निर्णय घेणार आहे .जनतेच तुमच्याबद्दल असलेले प्रेमच सांगतंय की जे २००९ ला माझ्या बाबतीत झाले तेच तुमच्या बाबतीत होणार आहे.त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.आपला विजय निश्चित आहे असे रोखठोक मत व्यक्त केले.
माझ्या टाइमाला जे झालं तेच तुमच्या टाइमाला होणार असे भालके यांनी म्हणताच संपूर्ण सभेत संजयमामा शिंदेंचा विजय असो असा जयजयकार पाहायला मिळाला.माढ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय शिंदे विरुद्ध भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यात चुरशीची लढत होत असून ही निवडणूक शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्टे ची केली आहे.

admin: