राज्य मंत्रिमंडळात 13 नवे चेहरे,विखे पाटील, तानाजी सावंत यांचा समावेश

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात 13 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपच्या 8, शिवसेनेच्या 2 आणि रिपाइं-आठवले गटाच्या एका आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे माजी नेते जयदत्त क्षीरसागर,शिवसेना नेते तानाजी सावंत यांचाही नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्र्यांमध्ये सहभाग आहे.

निष्क्रिय मंत्र्यांवर गंडांतर 

जुन्या मंत्रिमंडळातील निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. ताडदेव येथील एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर तोशेरे ओढले आहेत. त्यामुळे महेता यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी आशीष शेलार यांना संधी देण्यात आली. महेतांनी राजीनामा दिला, तर मुंबईतील गुजराती भाषिक चेहरा म्हणून योगेश सागर यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली.

13 जणांमध्ये 8 जण कॅबिनेट मंत्री असतील, तर 5 जण राज्यमंत्री असतील. पाहूया कुणाला कोणत्या दर्जाचं मंत्रिपदं दिले आहे

कॅबिनेट मंत्री

1) राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) – कॅबिनेट मंत्री

2) जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) – कॅबिनेट मंत्री

3) आशिष शेलार (भाजप) – कॅबिनेट मंत्री

4) संजय कुटे (भाजप) – कॅबिनेट मंत्री

5) सुरेश खाडे (भाजप) – कॅबिनेट मंत्री

6) अनिल बोंडे (भाजप) – कॅबिनेट मंत्री

7) तानाजी सावंत (शिवसेना) – कॅबिनेट मंत्री

8) अशोक उईके (भाजप) – कॅबिनेट मंत्री

राज्यमंत्री

1) योगेश सागर (भाजप) – राज्यमंत्री

2) अविनाश महातेकर (रिपाइं-आठवले गट) – राज्यमंत्री

3) संजय (बाळा) भेगडे (भाजप) – राज्यमंत्री

4) परिणय रमेश फुके (भाजप) – राज्यमंत्री

5) अतुल सावे – भाजप

धिरज करळे: