राज्यात 17 मतदारसंघात मतदानाला सुरुवात

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांच्या मतदानाच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशभरात पार पडत आहे. या टप्प्यात 9 राज्यातील 71 मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 17 मतदारसंघात आज मतदान होतेय. सकाळपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. चौथ्या टप्प्यात बिहारच्या 5, झारखंडच्या 3, मध्यप्रदेशच्या 6, महाराष्ट्राच्या 17, ओडिसाच्या 6, उत्तर प्रदेशच्या 13, राजस्थानच्या 13, पश्चिम बंगालच्या 8 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघाच्या कुलगाम जिल्ह्यातही 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे.

मराहाष्ट्रातील या मतदारसंघात होणार मतदान

राज्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. राज्यातील 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

राज्यातील या मतदारसंघात होत आहे मतदान

नंदूरबार, धुळे, डिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई मध्य उत्तर, मुंबई मध्य दक्षिण, मुंबई दक्षिणी, मवाळ, शिरुर आणि शिर्डी. या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत. सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत

admin: