युगदर्शक आयकॉन पुरस्काराची घोषणा ४ ऑगस्ट रोजी वितरण,मिरगणे, बारबोले, कबाडे, गोडसे अंधारे यांचा समावेश

बार्शी: येथील युगदर्शक प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून राजेंद्र मिरगणे, विजय कबाडे, अरुण बारबोले, गणेश गोडसे आदींना यंदाचा युगदर्शक आयकॉन पुरस्कार प्राप्त झाला आहे.
गेल्या सहा वर्षापासून युगदर्शक प्रतिष्ठानने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘युगदर्शक बार्शी आयकॉन’ पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा चालू केली आहे. याहीवर्षी आम्ही ही परंपरा कायम करत आहोत.
यावर्षी ‘युगदर्शक बार्शी आयकॉन पुरस्कार २०१९’चे वितरण ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ठिक ६ वा.
यशवंतराव चव्हाण सभागृह येथे होणार असून या पुरस्काराचे वितरण प्रख्यात साहित्यीक,वात्रटिकाकार,
कवी, माजी सदस्य विधानपरिषद मा.आ.प्रा. रामदास फुटाणे यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थानी माजी कॅबिनेट मंत्री व आमदार दिलीप सोपल हे असणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्री. श्रीकांत मोरे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री. सचिन खरात ,नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी हे उपस्थित राहणार आहेत.

पुरस्काराच्या सहाव्या वर्षी महाराष्ट्र आयकॉन महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र
मिरगणे, सोलापूर सौ. शुभांगी भोसले, पोलिस विजय कबाडे, सरपंच सौ. सुषमा जाधवर, संस्था तुकाराम शिंदे, शैक्षणिक अरुण बारबोले, उद्योजक सतिश अंधारे , बँकिंग मिलींद कांबळे, कृषी विजयसिंह नाईकनवरे, वैद्यकीय आयकॉन डॉ. अमोल जाधव, युवा अतुल पाडे, पत्रकारिता गणेश गोडसे या मान्यवरांना पुरस्कार जाहीर होत आहेत. तर कार्यक्रमा अगोदर बार्शीतील महेश पाटील यांचा ‘ओठावरली गाणी’ हा मराठी हिंदी गितांचा कार्यक्रम होत आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अवाहन प्रतिष्ठानचे विश्वस्त नितिन भोसले यांनी केले आहे. यावेळी संयोजन समिती सुधीर खाडे, सचिन गायकवाड, संजय
बारबोले, अजित काळे, गुरु साखरे, उदय पोतदार, नरेश ठाकूर, श्रीकृष्ण उपळकर, विशाल नवले,
नितीन जाधवर आदी उपस्थित होते.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: