राष्ट्रवादीच्या गळतीला स्वत: शरद पवारच जबाबदार, विनायक मेटेंच वक्तव्य

राष्ट्रवादीच्या गळतीला स्वत: शरद पवारच जबाबदार, विनायक मेटेंच वक्तव्य

शिवसंग्रामची महायुतीकडे विधानसभेच्या 12 जागांची मागणी, स्वत:हा बीडमधून लढणार असल्याचंही मेटेंनी केलं स्पष्ट

राष्ट्रवादीतील आऊटगोईंगवर शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटेंनी तिरकस टीका केली आहे. राष्ट्रवादीतील गळतीला स्वत:हा शरद पवारच जबाबदार असल्याचं आमदार मेटे म्हणाले. ते अकोला येथे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. कधीकाळी राष्ट्रवादीचे मोठे नेते असणाऱ्या मेटेंनी त्या पक्षाच्या आत्मचिंतन करण्याचा सल्लाही यावेळी बोलताना दिला. 

आज अकोल्यात शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटेंनी राष्ट्रवादीवर चौफेर हल्ला चढवला. ते आजपासून दोन दिवसांच्या अकोला आणि वाशिम जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी सध्या प्रस्थापितांचा पक्ष झाला आहे. ते प्रस्थापितांना सोडून सर्वसामान्यांकडे जाणार नाही, तोपर्यंत राष्ट्रवादीतलं आऊटगोईंग असंच सुरू राहील असंही मेटे म्हणाले. राष्ट्रवादी नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांचा पक्ष झाला नाही तर राष्ट्रवादीचे असेच हाल होतील, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

पक्षाच्या वाईट परिस्थितीमूळे शरद पवारांना या वयात जिल्ह्या-जिल्ह्यात फिरावं लागेल असंही ते म्हणाले. शिवसंग्रामनं महायुतीकडे विधानसभेच्या 12 जागांची मागणी केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपण स्वत:हा बीडमधून लढणार असल्याचं मेटेंनी स्पष्ट केलं. त्यामूळे बीडच्या जागेवरून शिवसेना आणि शिवसंग्राममध्ये पुढच्या काळात संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: