या धुंद वादळास कोटला किनारा…

आज महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांचा वाढदिवस आहे. साहेब म्हटलेे की, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील स्व.पंडीतअण्णा मुंंडेंनी या महाराष्ट्राला दिलेला दुसरा संघर्षयात्री ना.धनंजय मुंडे साहेब डोळ्यासमोर उभे राहतात. ना.मुंडे साहेबांचे जीवन म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेला समर्पित केलेले मुर्तीमंत उदाहरण होय.

राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणुन त्यांची कामगिरी अतुलनीय व सुवर्ण अक्षरांनी लिहीण्याजोगी आहे. दोन शब्दात व्यक्त करताना कवी ना.धो.महानोर म्हणतात….

मोडलेल्या माणसांचे दु:ख ओले झेलताना,
अनाथांच्या ऊषाला दिप लावुन झोपताना,
कोणती ना जात ज्याची कोणता ना धर्म ज्यांना,
दु:ख ओले दोन आश्रु माणसाचे माणसांना
या काव्यपंगती प्रमाणे जिल्हा परिषदेचा सदस्य ते विरोधी पक्षनेता हा प्रवास थक्क करणारा आहे.

पण विरोधी पक्षनेते या पदाची उंची गाठण्यासाठी चालतांना रस्त्यात अनेक संकट आली, कधी पाय रक्ताळलेले तर कधी स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब व स्व.पंडीतअण्णा यांच्या जाण्याने हळव्या मनाच्या ना.धनंजय मुंडे साहेबांच्या मनाला दु:ख आणी वेदनांचा चिखल तुडवत पुढे जावे लागले.

अनेकदा विरोधकांनी धनंजय मुंडे संपल्याचा कांगावा करत आनंद ही साजरा केला, पण तो फार काळ टिकला नाही. कधी सुतगिरणी चे प्रकरण तर कधी बीड जिल्हा बँक, तर कधी जगमित्र शुगर मिल्स बुजगावण्याच्या आडुन धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मागील महीन्यात तर ऐतिहासिक अधिवेशन होणार म्हणुन मोठा गाजावाजा केला.

सर्व मार्गांनी कोंडीत पकडण्याचे रात्र-रात्रा जागुन सरकारी यंत्रणा ही कामाला लावली होती, पण शेवटच्या क्षणी नियतीनेच ना.धनंजय मुंडेंचा न्याय केल्याने सर्व विरोधक तोंडावर पडले, आणि पुन्हा नव्या जोमाने अधिवेशन ना.मुंडे साहेब यांनी गाजवले, ऐतिहासिक केले, तो काळ कधीच विसरू शकत नाही, पुराव्यानिशी 16 मंत्र्यांवर केलेले आरोप. मराठा आरक्षणाचा पहिला ठराव साहेबांनी या देशात सर्वात आधी बीड जिल्हा परिषदेमध्ये मंजुर करून घेतला व पुढे सरकारला पाठवलो.

सभागृहाव व बाहेर रस्त्यावर आवाज उठवला, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. जय भिमचा सभागृहात नारा देणारे ना.मुंडे साहेब हे पहिले विरोधी पक्षनेते होय. धनगर समाजाच्या आरक्षणावुन तर सरकारचे अनेकदा वाभाडे काढले, मुस्लिम आरक्षणावरून सरकारला धारेवर धरले. शेतकर्‍यांची संपुर्ण कर्जमाफी, पिक विमा तात्काळ शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावा व शेतकर्‍याच्या मालाला हमीभाव द्यावा या मागण्यांच्या ना.मुंडे साहेबांनी केलेल्या शरसंधाणांनी तर सरकार घायाळ झाले.

सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. अनेक प्रश्न त्यातील संगणक परिचालक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटलांच्या मानधनाचा विषय लावुन धरत त्यांना न्याय मिळवुन दिला.

महाराष्ट्रातील जनतेला, वरिष्ठ सभागृहाला ही विरोधी पक्षनेता असतो हे ना.धनंजय मुंडेंमुळेच कळाले असे म्हंटले तरी वावगं ठरणार नाही…हे करत असताना परळी विधानसभा मतदार संघातील जनतेच्या सुख, दुःखांचे वाटेकरीच आहेत.

सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ परळी विधानसभा मतदार संघामध्ये ना.मुंडे यांनी उभा करून 1100 पेक्षा जास्त सर्वसामान्य कुटुंबातील भगिनींची सालांकृत विवाह केले.

आज हा नेता महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत आहे. प्रत्येक सभेला लाखोंचा जन समुदाय आणि शब्दा शब्दांवर समुद्राच्या लाटाप्रमाणे उसळणारा जनसागर पाहिला की, उद्याच्या महाराष्ट्राचे राजकीय पटलावरील ना.धनंजय मुंडे साहेब हे केंद्र बिंदु असतील यात शंका नाही.

राज्याच्या व देशाच्या राजकारणातील जाणकार नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे कार्यकर्त्यातील गुण ओळखण्यात माहीर.त्यांच्या नजरेतून सक्रिय पक्ष कार्यकर्ता कसा सुटेल. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करताच पवार साहेबांनी त्यांना विधानपरिषदेचे सदस्य केले. लगेच काही दिवसात ज्या पदाला मोठा वारसा आहे अशा विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेते पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मुंडे यांनी ही या पदाला न्याय देत पवार साहेब, अजितदादा व पक्षांनी दिलेली जबाबदारी सार्थ करून दाखवली.

इतकी मोठी उंची गाठलेल्या नेत्याला शाबासकी द्यायला स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब व स्व.पंडितअण्णा मुंडे यांची कमतरता मात्र कायम आहे. साहेबांच्या मातोश्री रूक्मीणबाई मुंडे व पत्नी राजश्रीताई मुंडे खंबीरपणे सोबत असतात. अशा या नेत्याला आरोग्य आणि आयुष्य दीर्घ लाभो आणि महाराष्ट्रातील जनतेची त्यांच्या हातुन सेवा घडो हीच प्रभु वैद्यनाथ व संत जगमित्र नागा महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना…
धन्यवाद..!

शब्दांकनः- सौरभ खराडे
मो.-9423903125

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: