‘या ‘ कारणासाठी सोलापूर चे अश्विनी रुग्णालय काही काळासाठी बंद ;वाचा सविस्तर-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अश्विनी रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.त्यामुळे अश्विनी सहकारी रुग्णालय स्वच्छतेसाठी आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात येत आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र घुली यांनी दिली आहे .

या स्वच्छतेचे काम पूर्ण होताच पूर्ण कार्यक्षमतेने हॉस्पिटल रूग्णांच्या सेवेसाठी रूजू होईल असेही त्यांनी सांगितले.या गैरसोयीबद्दल दिलगीर असून रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी सहकार्य करावे असा बोर्डही रुग्णालयाच्या गेटवर लावण्यात आलेला आहे.

सध्याला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार खाजगी दवाखाने आणि डॉक्टरांना वैद्यकीय सेवेसाठी आवाहन करत आहे. तसेच वैद्यकीय सेवेसाठी हजर न राहणाऱ्या डॉक्टर तसेच वैद्यकीय संस्थेवर कायदेशीर बडगा उगारण्याची ही तयारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दाखवली आहे.दरम्यान इतके सुसज्ज आणि प्रसिद्ध रुग्णालय अचानक कसे निर्जंतुकीकरण करण्यासाठी बंद करण्यात आले.याची चर्चा नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर होत आहे

अश्विनी रुग्णालयामध्ये काही स्टाफचे कोरोना लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाले मुळे आणि काहीजणांची तपासणी आणि अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे रुग्णालयाने गेले काही दिवसापासून दक्षतेपूर्वक रुग्णाची छाननी करुन तपासणी उपचार केलेले आहेत. दोन रुग्णांनी अपूर्ण माहिती दिल्यामुळे दक्षता घेऊन सुध्दा दाखल झालेमुळे आणि त्यांच्या संपर्कामुळे कर्मचारी यांना लागण झालेमुळे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामुळे संपूर्ण सुरक्षा आणि दक्षतेसाठी आरोग्यसेवेच्या नियमाप्रमाणे संपूर्ण हॉस्पिटल बंद ठेवून सर्व विभागांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करुन घेणे आवश्यक असल्याने ही कार्यवाही करीत आहोत. संबंधित कर्मचारी यांची व्यवस्था सिव्हील हॉस्पिटल,महानगरपालिका आरोग्य सेवा यांच्या सहकार्याने केलेली असून काही हॉस्पिटलमध्ये आणि काही विलगीकरण केंद्रात दाखल आहेत.
डॉ. राजेंद्र घुली
वैद्यकीय अधिक्षक

ग्लोबल न्युज नेटवर्क: