या’ कारणामुळे दिला अब्दुल सत्तार यांनी राजीनामा

मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेला गदारोळ काही थांबण्याचे नाव घेत नाही. मंत्रीपदासाठी केवळ राष्ट्रवादी-कॉंग्रेसच नव्हे तर शिवसेना आमदारांमध्ये असंतोषही चव्हाट्यावर आला आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाच दिवसांनी शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद कॉंग्रेसला देण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही.

अब्दुल सत्तार हे औरंगाबादमधील जिल्हा परिषदेचे उपसभापतीपद राजीनामा देण्याचे कारण असल्याचे सांगत असले तरी अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रीपदासाठी नियुक्त केले गेले. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा होती. सत्तार यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तार यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याची माहिती आहे. अब्दुल सत्तार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे त्यांना आवडते मंत्रालय देऊन मनधरणी करतील असं बोललं जात आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: