‘या’ अटीवर अजित पवारांनी दिला राजीनामा

मुंबई । प्रचंड नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत असल्याचं पत्रकार परिषदेत जाहीर केलं. तत्पूर्वी, अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. फडणवीस म्हणाले की, अजित पवारांनीही काही कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आमच्याकडे बहुमत उरलेलं नाही, हे स्पष्ट आहे. यामुळे आता जे कोणी सत्तास्थापन करतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर त्यांनी राजीनामा दिल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी अजित पवारांची समजूत घालण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्या मनात प्रतिभा पवार यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांचा शब्द ते मानतात. सुप्रिया सुळे यांचे पती संदानंद सुळे यांच्या माध्यमातून अजित पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट झाल्याचे सांगण्यात येते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: