शिवसेनेचे हिंदुत्व सोनिया गांधींच्या चरणी, फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुंबई । तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही काळानंतर त्यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि तेथे त्यांनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले. माध्यमांना संबोधित करतांना त्यांनी शिवसेनेवर हल्ला केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत देण्यात आले आणि भाजपला जास्तीत जास्त 105 जागा मिळाल्या. आम्ही शिवसेनेसोबत निवडणूक लढविली होती आणि जनादेश हा भाजपला होता.

शिवसेनेवर मोठा आरोप करत ते म्हणाले की, शिवसेनेने निवडणुकीपूर्वी आम्हाला सांगितले होते की, जे आम्हाला मुख्यमंत्रीपद देईल आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. ते म्हणाले, ‘आम्ही बऱ्याच काळापासून त्यांची वाट पाहिली, पण त्यांनी उत्तर दिले नाही आणि त्याऐवजी कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केली. जे कुणालाही भेटायला मातोश्रीच्या बाहेर पाय न ठेवत नव्हते, ते राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसबरोबर सरकार स्थापण्यासाठी घरोघरी जाऊन वाटाघाटी करत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता मी राजभवनात जाऊन स्वत: राजीनामा देईन. जे लोक सरकार स्थापन करतील अशा सर्वांना मी शुभेच्छा देतो. परंतु हे एक अत्यंत अस्थिर सरकार असेल कारण त्यात बरेच मतभेद आहेत. ते म्हणाले की, शिवसेनेचा हिंदुत्व सोनिया गांधींच्या चरणी आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: