..म्हणून कोणत्याही गोष्टीचा ‘गर्व’ करू नये

हे शरीर सोडून एक दिवस जायचे आहे. या शरीरात राहणारा ‘मी’ कोण आहे ? मी कशाचा अहंकार अथवा गर्व करावा ? पहिलवान मनुष्य एका दणक्यामध्ये शंभर किलो वजनाचे पोते उचलून जमिनीवर टाकतो. तोच पहिलवान ताप आल्यानंतर इतका दुर्बल होतो, की त्याला हात धरून उठवावे लागते. सत्तराव्या, ऐंशीव्या वर्षी आपली परिस्थिती कशी असेल, याचा विचार वृद्ध माणसे व अल्झायमर पेशंट्स यांच्याकडे पाहून करावा. अशा प्रकारे चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने गर्व अहंकार कमी होतो.

अनित्यानि शरीराणी |वैभवं नैव शाश्वतम् || नित्य सन्नीहतो मृत्यू | कर्तव्यं धर्मसंग्रहा: ||

अर्थ :- शरीर हे अनित्य आहे. सारखे बदलत असते. वैभव शाश्वत नाही. मृत्यू कुठल्याही क्षणी झडप घालू शकतो, याची जाणीव ठेवून आध्यात्मिक प्रगतीसाठी सतत प्रयत्न करावा.

सर्व येथे राहणार | काही न येई बरोबर || सत्कर्म आणि सदाचार | हेचि जीवाचे सांगाती ||

ग्लोबल न्युज नेटवर्क: