मोदींनी जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा उंचावली: माजी आमदार राजेंद्र राऊत, बार्शीत प्रचारसभा

बार्शी : पुलवामाध्ये शहीद झालेल्या चाळीस जवानांच्या मृत्यूचा बदला देशाचे धाडसी नेतृत्व असलेल्या नरेंद्र मोदींनी एअर स्ट्राईक करुन घेतला़ एवढेच नव्हे तर जागतिक पातळीवर मोंदीनी देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले असल्याचे सांगत बार्शीत सुरु असलेल्या भूयारी गटारीसह विविध विकास कामांमुळे विरोधकांचा पोटशुळ उठला असल्याची टिका भाजपा नेते माजी आ़ राजेंद्र राऊत यांनी केले़
ते महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शहरातील उपळाई रोड येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते़ यावेळी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, भाजप नेते अरुण बारबोले, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, नगरसेकव विजय राऊत, बांधकाम सभापती विजय चव्हाण,उपसभापती अविनाश मांजरे मेजर दत्तात्रय मोरे, सुभाष लोढा, रिपाईचे कांबळे माजी सभापती पी़एऩ गव्हाणे, केशव घोगरे, आदी उपस्थित होते़
पुढे बोलताना राऊत म्हणाले, मागील दहा वर्षात पालिकेतील विरोधकांचे आमच्या सव्वा दोन वर्षाच्या कारकिर्दीतील कामकाज पहाता ,आम्ही कोट्यावधीचा निधी खेचून आणत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहोत़ शहरात मोठ्या प्रमाणात भुयारी गटार योजनेची कामे सुरु असल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे याची मला जाणीव आहे़ मात्र शहराच्या भल्यासाठी थोडे दिवस हे सहन करा असे आवाहन त्यांनी केले़ सोशल मिडीयावर विरोधकाकडून धुळ व पाण्याचे राजकारण केले जात आहे़ पण जनतेचा माझ्यावर विश्वास आहे़ जनतेने टाकलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही़ व जनतेशी बेईमानी करणार नाही़ माझ्याकडून काम होत नाही असे वाटल्यास मी राजकारण सोडून घरी बसेल असेही ते म्हणाले़
उजनीच्या पाणीपुरवठा संदर्भात बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांचे नाव न घेता पाणी आणले कोणी , त्याचे श्रेय घेतय कोण असा प्रश्न उपस्थित करीत ६६ कि़मी़ वरुन पाणी येत असताना सुध्दा त्याचे योग्य तांत्रिक नियोजन न केल्यामुळे सतत पाईपलाईन फुटत आहे़ विरोधकांची दहा वर्षाची व आमच्या सव्वा दोन वर्षाच्या सत्तेची तुलना केली असता त्यांच्यापेक्षा पाचपट जादा निधी शहर व तालुक्याच्या विकासासाठी आणला आहे व आगामी काळात ही सुमारे ४०ते पन्नास कोटी रुपयाचा निधी आणू अशी ग्वाही त्यांनी दिली़
यावेळी केशव घोगरे, वाहीद शेख, विजय चव्हाण, मेजर मोरे यांनी मोदी सरकारची कामगिरी सांगत विराधकांचा समाचार घेतला़ सुत्रसंचालन मंगेश दहिहांडे यांनी केले़

admin: