पवारांच्या घरातील किती जणांना पदे हवीत याचा विचार करा-देवेंद्र फडणवीस

सुपे: शरद पवारांच्या घरात आजोबाला पंतप्रधान, दादांना मुख्यमंत्री, ताईंना केंद्रात मंत्री व्हायचेय, पार्थला खासदार, तर आणखी एकाला आमदार व्हायचे आहे, मग कार्यकर्ते काय आयुष्यभर सतरंजाच उचलणार का, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महायुतीच्या उमेदवार कांचन कूल यांच्या प्रचारार्थ बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी जाहीर सभेत ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह अन्य यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, सुपे येथील  सभेचा जनसमुदाय पाहिला, तर आज पवारांच्या घरी कोणी झोपू शकणार नाही, अशी स्थिती होईल. येथील जनसागराचा मतांचा पाऊस पाडू, या लोकसभेचा निकाल यापूर्वीच लागला आहे. त्यांच्या कॅप्टनने बॅटिंग सुरू केल्याक्षणी माघार घेतली, त्याचवेळी निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला. 

शरद पवार राज्यसभेवर असल्याने वाचले; परंतु त्यांच्या घरातील कोणीही आता लोकसभेत जाणार नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. मतदारांशी मी बोललो तर पवारांवर सूड उगवण्याची नामी संधी उपलब्ध करून दिल्याचे ते म्हणत आहेत, असेही ते म्हणाले. पार्थ हरल्यावर अजित पवार घरी तरी जाऊ शकतील का, असा सवाल त्यांनी केला. पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्यापासून ते त्यांच्या विश्‍वासघाताची अनेक उदाहरणे देता येतील, असेही ते म्हणाले.

admin: