मुख्यमंत्र्यांनी केली पालकमंत्र्यांनी नियुक्ती, आठ जिल्ह्यांची ‘या’ मंत्र्यांवर जबाबदारी !

मुंबई – राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता 25 दिवसांनी पालकमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध आठ जिल्ह्यांसाठी नव्या मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आणखी एका म्हणजेच चंद्रपूर सोबतच गडचिरोलीचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तर मुखमंत्र्यांनी त्यांचे विश्वासू डॉ परिणय फुके यांच्या खांद्यावर ही दोन जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.

या मंत्र्याकडे हा जिल्हा?

हिंगोली – अतुल सावे, वर्धा – चंद्रशेखर बावनकुळे, बुलडाणा – संजय कुटे, गडचिरोली – सुधीर मुनगंटीवार , अमरावती – डॉ. अनिल बोंडे
पालघर – रवींद्र चव्हाण, भंडारा – डॉ. परिणय फुके, गोंदिया – डॉ. परिणय फुके

दरम्यान औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरुन पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता होती. औरंगाबाद शहराचे आमदार अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्याकडे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्याची मागणी केली जात आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी कायम आहेत. त्यामुळे याठिकाणी स्थानिक भाजपमध्ये नाराजी आहे.

सावंतांना पालकमंत्री पद नाही
या पालकमंत्री वाटपात शिवसेनेचे उपनेते जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवले जाईल अशी शक्यता होती. मात्र त्यांना उस्मानाबाद तर नाहीच पण अन्य कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले नाही.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: