मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा, उमेदवारी अर्ज ठरला वैध

नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी जोडलेल्या शपथपत्रात डिसेंबर 2018 च्या नोटरीचा शिक्का वापराला आहे असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यांचा हा अर्ज रद्द करण्याची मागणी काँग्रेस, आप, व अपक्ष उमेदवारांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या प्रकरणावर आता सुनावणी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अर्ज हा वैध ठरवण्यात आला आहे.

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख, जय जवान जय किसानचे उमेदवार प्रशांत पवार व आम आदमी पार्टीचे उमेदवार अमोल हाडके यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या अर्जवार आक्षेप नोंदवण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या शपथपत्रावर वापरलेला संबंधित नोटरीचा शिक्का हा कालबाह्य झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे तो ग्राह्य धरता येणार नसल्याचे ते म्हणाले होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: