तिहार जेलमध्ये असणाऱ्या पी. चिदंबरम याची प्रकृती खालवल्याने ‘एम्स’मध्ये दाखल

नवी दिल्ली ।  कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. आज त्यांनी पोटात तीव्र वेदना होत अल्याची तक्रार केली, त्यानंतर त्यांना एम्स मध्ये पाठविण्यात आले. पी चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात गुन्हा दाखल आहे. ते सध्या तिहार जेलमध्ये बंद आहेत.

पी चिदंबरम यांनी यापूर्वी कोर्टाकडे घरगुती जेवणाची मागणी केली होती, जी कोर्टाने मान्य केली. तुरूंगातील अन्न खाऊन त्याचे वजन कमी केले जात असल्याचे ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांना घरगुती अन्न खाण्याची परवानगी दिली पाहिजे. मात्र, कोर्टाने त्यांना दिवसातून फक्त एकदाच घरातील पदार्थ खाण्याची परवानगी दिली आहे.

दिल्लीच्या कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडी 17 ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणातील घोटाळ्याच्या आरोपाखाली माजी मंत्री चिदंबरम यांना सीबीआयने 21 ऑगस्टला दिल्लीच्या निवासस्थानी अटक केली होती. काही दिवसांच्या रिमांडवर राहिल्यानंतर चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात जावे लागले. यापूर्वी चिदंबरम यांची नियमित जामीन याचिका हायकोर्टामधून फेटाळून लावण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: