मुख्यमंत्री खुश:कार्यक्षमता आणि विश्‍वासार्हतेमुळे महाहौसिंगचे सहअध्यक्ष मिरगणे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

मुख्यमंत्री खुश:कार्यक्षमता आणि विश्‍वासार्हतेमुळे महाहौसिंगचे सहअध्यक्ष मिरगणे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांना राज्य शासनाने कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे. गेल्या सात महिन्यात मिरगणे यांनी या पदाच्या माध्यमातून दाखविलेल्या कार्यक्षमतेचा आणि धडाडीने घेतलेल्या महत्वाकांक्षी निर्णयावर या दर्जानिश्‍चिती मुळे शिक्कामोर्तब झाले आहे. 

महाहौसिंग या महामंडळाच्या नव्याने झालेल्या स्थापनेमागे राज्यातील प्रधानमंत्री आवास रोजनेच्या माध्यमातून होणार्‍या शासकीय गृहनिर्माणाला गती देण्याचे धोरण आहे. या महामंडळावर मिरगणे यांची झालेली नियुक्ती हे त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्ष आणि पक्ष नेतृत्व त्यांच्या विश्‍वासाचे प्रतिक होते. आणि तो विश्‍वास सार्थ करुन दाखविण्याचे काम मिरगणे रांनी केले. 


मिरगणे यांच्याकडे नुकतेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या निवासी वस्तींच्या हानी नंतर गृहनिर्माणाच्या बाबतीमधल्या पुनर्वसन कार्याचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच स्वयंपुनर्वसन प्रकल्पाचीही सर्वंकष धुरा शासनाने त्यांच्याकडे दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील शासकीय गृहनिर्माण व मंजुरी व सनियंत्रण रा उच्चस्तरीय समितीवरही गृहनिर्माण तज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. 
मिरगणे यांनी पाच वर्षात भाजपामध्ये निष्ठेने केेलेले कार्य हे जसे त्यांच्या निरुक्तीला कारणीभूत आहे, त्याचबरेाबर त्यानी जागतिक पातळीवर स्थापत्य क्षेत्रात उपयोजन केले जाणार्‍या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला व कोणत्याही नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकावू व मजबूत राहतील अशी घरे सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत केलेली मांडणीही त्यांच्या नियुक्तिमध्ये महत्वाची ठरली आहे. 
मिरगणे यांनी महाहौसिंगच्या माध्रमातून राज्यातील घरांपासून वंचित अशा सरकारी कर्मचार्‍यासाठी  समर्पित वसाहती उभारण्याचाही निर्णय नुकताच घेतला आहे. व आजपर्यंत राज्यात 25 हजाराहून अधिक घरांना मंजुरीही मिळाली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ग्रामीण भागातही स्मार्ट व्हिलेज उभारण्याबाबत मोठ्या गावांमध्ये समुहगृहप्रकल्पांचीही उभारणी महाहौिंसगच्या माध्यमातून होणार आहे. 
मिरगणे यांनी राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 26 लाख घरांचे उद्दिष्ट्य पुर्ण होण्याच्या दृष्टीने महाहौसिंग महत्वाचा वाटा कशाप्रकारे उचलू शकते, याची चुणुक गेल्या 7 महिन्यात दाखवली आहे. महाहौसिंग समोर मार्च 2022 पर्रंत 5 लाख घरांना मंजुरी देण्याचे उद्दिष्ट्य आहे. मिरगणे यांचा कामाचा झपाटा लक्षात घेतला तर हे उद्दिष्ट्य पुर्ण करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले टाकत आहेत, हे लक्षात रेते. आजपर्यंत राज्यात शासकीय गृहनिर्माणाच्या क्षेत्रात कार्ररत असलेल्या इतर संस्थांना एक पुरक संस्था म्हणून महाहौसिंग कशाप्रकारे उपयुक्त ठरु शकते. मिरगणे यानी आपल्रा कार्यपध्दतीमधून सिध्द केले आहे. मिरगणे रांना मिळालेला मंत्रीपदाचा दर्जा हा बार्शीकरांचीही मान उंचावणारा आहे. त्याचप्रमाणे भाजपा शासन हे लोककल्याणकारी क्षेत्रात ज्ञान, कौशल्य व अनुभव असलेल्या व्याक्तींना स्थान देते. व गुणग्राहकतेने निमशहरी ग्रामीण भागात कार्यरत कार्यकर्त्यांला राज्यपातळीवर काम करण्याची संधी देते, हे मिरगणे यांना मिळालेल्या संधीमुळे सिध्द झाले आहे.

बापूसाहेब कदम

सरचिटणीस भाजपा बार्शी शहर

ग्लोबल न्युज नेटवर्क: