आजपासून काश्मीरमध्ये टेलीफोन सेवा सुरू, जम्मूमध्ये इंटरनेट सेवा सुरळीत

राज्य प्रशासनाने प्रदेशातील सर्व शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालय सोमवारी 19 ऑगस्टपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.

नवी दिल्ली | जम्मू आणि काश्मीरमध्ये आज शनिवारपासून फोन सेवा सुरू झाल्या आहेत. तर जम्मूमध्ये टू जी स्पीडने इंटरनेट सेवाही सुरू करण्यात आली आहे. जम्मूसोबतच संबा, कठुआ, उधमपुरमध्येही टू जी स्पीडची इंटरनेस सेवा सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमद्ये पाच ऑगस्टपासून टेलीफोन सेवा बंद होती. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने फोन आणि इंटरनेट सेवा बंद केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार राज्य प्रशासनाने प्रदेशातील सर्व शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालय सोमवारी 19 ऑगस्टपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.

विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवण्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने या परिसरात कलम 144 लागू केले होते. यामुळे गेल्या 12 दिवसांपासून घाटीमध्ये संप्रेषण सेवा बंद करण्यात आल्या होत्या. यासोबतच शाळा आणि कॉलेजही बंद होते. परिस्थिती जसजशी सुधारत आहे. येथील निर्बंध हटवले जात आहेत. 16 ऑगस्टला जम्मू काश्मीर प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मीडियाला सांगितल्यानुसार येथील परिस्थिती आता शांततापूर्ण आहे. घाटीमधील जास्तीत जास्त भागात लावलेले निर्बंध आता कमी करण्यात आले आहे. आतापर्यंत येथील परिस्थिती शांततापूर्ण आहे. ते म्हणाले की, येथे सुरुवातीप्रमाणेच सुरक्षारक्षक तैणात आहेत. लोकांना आजुबाजूबाजूला आणि इतर शहरांमध्ये येण्याजाण्याची परवाणगी देण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: