मुंबईत ९७ वर्षीय आजीने केली कोरोनावर मात,केवळ सात दिवसात डिस्चार्ज

मुंबईत ९७ वर्षीय आजीने केली कोरोनावर मात,केवळ सात दिवसात डिस्चार्ज

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत अतोनात वाढ होताना दिसत आहे. तसेच काही अंशतः मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे .अशातचं सर्वांचं मनोबल वाढवणारी एक सकारात्मक घटना मुंबई शहरात घडली आहे. मुंबईच्या प्रिन्स अली खान रुग्णालयातून कोरोना बाधित 97 वर्षाच्या आमीना सुनेसरा यांना सात दिवसांच्या उपचारानंतर आज सुखरुप घरी सोडण्यात आले.

वय जास्त असल्यामुळे आणि कमी ऐकू येत असल्याने उपचार करण्यास काही अडचणी आल्या. पण आमीना यांच्या जिद्दीपुढे सर्व अडचणींनी लोटांगण घातले. एबीपी माझानं ही बातमी दिलीय. आमीना यांच्या कुटुंबातील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आठ दिवसांपूर्वी आमीन सुनेसरा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लक्षण ही दिसत होती. त्यांना मुंबईच्या प्रिन्स अली खान रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि फक्त सात दिवसातच कोरोनावर मात करत आमीना सुखरुप घरी परतल्या. दरम्यान, राज्यात शुक्रवारी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: