मी पुन्हा येईल… पण कुठे बसेल हे नव्हते सांगितले, जयंत पाटलांचे फडणवीसांना टोले

मुंबई | राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. दरम्यान आज विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू आहे.

यामध्ये नेत्यांचे भाषणं सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईल असे ते म्हणाले होते. पण कुठे बसणार हे नव्हते सांगितले असे म्हणत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे. विरोधीपक्ष नेते म्हणून आज देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.  यावेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

यंदाच्या निवडणुकांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईल… अशी घोषणा केली होती. त्यांनी विधानसभेच्या अखेरच्या भाषणामध्येही असे म्हटले होते. तसेच प्रचार सभांमध्येही ते वारंवार मी पुन्हा येईल या घोषणेचा वापर करत होते. त्यांची ही घोषणा यंदाच्या निवडणुकांमध्ये प्रचंड चर्चेत होती.

मी पुन्हा येईल असे म्हणूनही देवेंद्र फडणवीसांना मात्र विरोधी बाकावर बसावे लागले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या वाक्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली. आज विधानसभेतही त्यांच्या या घोेषणेचा उल्लेख करण्यात आला. जयंत पाटलांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे. मी देवेंद्र फडणवीसांना विरोधीपक्ष नेता म्हणणार नाही तर जबाबदार पक्षनेता असे म्हणेल असे ते म्हणाले. मी पुन्हा येईल ही तुमची जी भूमिका होती त्यामध्ये तुम्ही कुठे बसणार हे सांगितले नव्हते असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला. 

ग्लोबल न्युज नेटवर्क: