देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा

मुंबई | राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. भाजप यंदाच्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र शिवेसनेसोबतची युती तुटल्यानंतर त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. आज विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांनी त्यांचा पदभार स्वीकारला आहे. यानंतर आता विरोधी पक्षनेते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार स्थापन जाले आहे. शनिवारी 169 आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर उद्धव ठाकरेंच्या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. दरम्यान भाजपने मात्र कामकाज नियमाला धरुन होत नाही नसल्याचे म्हणत सभात्याग केला होता. यानंतर आज रविवारी विधानसभेत अधिवेशन सुरू आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: