भाजप नव्हे तर देशात सर्वाधिक बँक बॅलन्स मायावती च्या बहुजन समाज पक्षाकडे

टीम ग्लोबल न्युज:
देशभर लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र वातावरण गरमागरम झाले आहे. विविध पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रांद्वारे आपली संपत्ती जाहीर करत आहेत,त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपला उमेदवार गरीब की श्रीमंत आहे कळत आहे. पंरतु कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे, हे समजू शकत नाही. यावर्षी निवडणूक आयोगाने याबाबत एक अहवाल प्रसिध्द करून ही माहिती समोर आणली आहे.

निवडणूक आयोगाच्या रिपोर्टनुसार देशातल्या सर्व राजकीय पक्षापेक्षा उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीकडे (बसपा) सर्वाधिक बँक बॅलन्स आहे. बसपाकडे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मिळून तब्बल 670 कोटी रुपये बँक बॅलन्स आहे.तर दुसरा क्रमांक ही उत्तर प्रदेश च्या अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी (सपा) आहे. सपाकडे तब्बल 471 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे.
निवडणूक आयोगाच्या रिपोर्टमध्ये लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे. देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि प्रमुख विरोधी काँग्रेस हे दोन्ही पक्ष संपत्तीच्या बाबतीत बसपा आणि सपाच्या जवळपास ही नाहीत.

निवडणूक आयोगाच्या रिपोर्टनुसार काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसकडे 196 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. तर आंध्रप्रदेश मधील चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष तेलुगु देसम पार्टी (टीडीपी)चौथ्या क्रमांकावर आहे. टीडीपीकडे 107 कोटी रुपये इतका बँक बॅलन्स आहे.

या यादीत भारतीय जनता पक्ष (भाजप) पाचव्या क्रमांकावर आहे. भाजपकडे 82 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. मागील वर्षी भाजपला तब्बल 1 हजार 27 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या परंतु. गेल्या वर्षभरात भाजपने जाहिरातींसह पक्षाच्या इतर कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे पक्षाकडे 1027 कोटी रुपयांपैकी केवळ 82 कोटी रुपये शिल्लक आहेत.

admin: