मुंबई ।‘महाविकासआघाडी’चे शक्तिप्रदर्शन, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी एकजुटीची शपथ घेतली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सत्यमेव जयते हे वाक्य आपल्याला सत्तामेव जयते होऊ द्यायचं नाही. हे दृष्य पाहूनही जर कुणाच्या डोक्यात प्रकाश पडत नसेल, तर तिन्ही पक्ष मिळून प्रकाश पाडण्याची हिंमत आपल्या मनगटात आहे. पुन्हा येईन म्हणणार नाही, आम्ही आलेलो आहोत. मध्ये आलात तर काय करायचं ते करण्यासाठी समर्थ आहोत. आडवं येण्याचा प्रयत्न करायचा असेल, तर करुनच पाहा. शिवसेना काय आहे हे पाहायचं असेल तर त्याचीही आमची तयारी आहे. हात-पाय मारण्याचा जो केविलपणाचा प्रयत्न चाललाय, त्यामुळे आम्ही अजून घट्ट होऊ. आमदार फक्त खुर्च्या उबवण्यासाठी एकत्र आलेले नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते करणाऱ्या शक्तीला मातीत गाडण्याची सुरुवात आम्ही शिवरायांच्या महाराष्ट्रातून करत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आमच्याकडे 162 पेक्षा जास्त आमदारांचे समर्थन – अशोक चव्हाण
23 तारखेचा शपथविधी अल्पमतातीत शपथविधी – बाळासाहेब थोरात
‘महाविकासआघाडाची विजय असो’ अशी घोषणाबाजी
तीनही पक्षांचे आमदार आणि समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारही उपस्थित होते.
आम्ही 162, महाविकासआघाडीचे शक्ती प्रदर्शन