महाराष्ट्र सरकारच्या मिस मॅनेजमेंटमुळेच महापुराचा गोंधळ उडाला:जयंत पाटील (व्हिडिओ)

सांगली: सांगली कोल्हापूर जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.’या परिस्थितीला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्र सरकारच्या मिस मॅनेजमेंटमुळेच हा पुराचा गोंधळ उडालेल आहे आणि आम्ही जास्त पाणी सोडण्याच्या मनस्थितीत नाही, असे खुद्द आता भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

इतकी भीषण समस्या असूनदेखील राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सांगली,कोल्हापूरमध्ये येऊन टीवल्या बावल्या करत सेल्फी घेत फिरतात. विरोधी पक्षाचे आमदार फोडणं इतकीच जरी मंत्र्याची झेप असेल तर महाराष्ट्राने कोणाकडे बघावं? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

हे सर्व पाहिले तर लक्षात येते की सरकारला या संकटाचे गांभीर्य कळलेले नाही. सहा दिवस झाले आज सातवा दिवस आहे. अद्यापही मदत व्यवस्थितपणाने पोहचलेली नाही. National Disaster Response Force, India च्या आवश्यक तितक्या टीम वेळेवर पोहचवणे आवश्यक असताना त्यात ही सरकारला यश आलेले नाही.

ज्या पद्धतीने सरकारकडून मदत मिळायला हवी तशी अजूनही मिळत नाही. स्थानिक सांगली जिल्ह्यातील माझे नागरिक प्रयत्नांची शर्थ करुन माणसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे या सरकारची अनास्था आता सांगली आणि कोल्हापूरकरांच्या समोर आली आहे.या बाबतचा व्हिडिओ पाटील यांनी प्रसिद्ध केला आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: