भाजपने चार राज्यात केल्या प्रभारिंच्या नियुक्त्या महाराष्ट्राची धुरा या नेत्यांच्या खांद्यावर

आगामी काळात चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपने शुक्रवारी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चार राज्यातील निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची निवड केली आहे.

पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी महाराष्ट्र, राजधानी दिल्ली, हरयाणा, झारखंड या राज्यातील पक्षातील प्रभारींची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भूपेंद्र यादव, दिल्लीत प्रकाश जावडेकर, हरयाणात नरेंद्र सिंह तोमर तर झारखंडमध्ये ओम प्रकाश माथूर यांची प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कर्नाटकचे माजी आमदार लक्ष्मण सावदी यांनी सह प्रभारी बनवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्या राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना दिल्लीतील निवडणूक प्रभारी बनवण्यात आले आहे. तर हरदीप सिंह पुरी आणि नित्यानंद राय यांना सह प्रभारी बनवण्यात आले आहे. दिल्लीत आपचे सरकार असून भाजपचे फक्त तीन आमदार आहेत.

केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना हरयाणाचे निवडणूक प्रभारी बनवण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेशमधील मंत्री भूपेंद्र सिंह यांना सह प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हरयाणात सध्या भाजपचे सरकार आहे.

झारखंडमध्ये पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम प्रकाश माथूर यांना प्रभारी तर बिहारचे मंत्री नंदकिशोर यादव यांना सह प्रभारी पदाची जबाबादारी देण्यात आली आहे. झारखंडमध्ये झारखंड स्टुडंट युनियन आणि भाजप युतीचे सरकार आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल न्युज नेटवर्क: