महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करण्याची क्रांती सुरु झाली आहे, किरिट सोमय्या यांचा आघाडीविरोधात एल्गार

 

कोल्हापूर | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्थानकात देण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरच्या अंबामातेचं दर्शन घेतलं. यानंतर पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख भ्रष्टाचाराचा राक्षस असा केला.

अंबामातेच्या चरणी मी प्रार्थना केली आहे, अंबामातेने जसा त्यावेळी राक्षसांचा वध केला होता, आता महाराष्ट्रात जो भ्रष्टाचाररुपी राक्षस आहे, त्याचा वध करण्यासाठी मला थोडीशी ताकद दे, असं सोमय्या यांनी माध्यमांसमोर म्हटलं आहे. एका बाजूला राज्याचे साडेबारा कोटी लोकं भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर येऊन आम्हाला निरोप देतात, आमच्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यावेळेला हे भ्रष्टाचाररुपी सरकार आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात, पण महाराष्टाला भ्रष्टाचार मुक्त करण्याची क्रांती आता सुरु झाली आहे, अंबामाता आम्हाला आशिर्वाद द्या असा एल्गार सोमय्या यांनी केला.

शिवसेना खासदार भावना गवळी यांचे सहकारी सईद खान याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, कराडमध्य माझ्या गाडीवर दगडाने हल्ला करण्यात आला होता, त्याचा मास्टर माईंड सईद खान होता, आज तो सईद खान जेलमध्ये आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. ईडीची चौकशी लागली की काहीजण गायब होतात, काहीजण हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होतात असा टोला सुद्धा अडसूळ आणि मुश्रीफ यांना लगावला होता.

Team Global News Marathi: