‘येत्या चार महिन्यांत महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ दवाखान्यात असेल’

 

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. ईडीने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर अनिल परब हजर राहिले तसेच आज किरीट सोमय्या सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज पुन्हा एक मोठा घोटाळा मंत्री मुश्रीफ यांचा उघडीस आणला आहे. आज सोमय्या यांनी अंबाबाईच्या दर्शन घेतल्यानंतर ते मुरगूडला जाणार असून तेथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात फिर्याद देणार आहेत. सोमय्या यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपने आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर सोमय्या २० सप्टेंबरला कोल्हापुरात येणार होते. तेव्हा त्यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीने जोरदार विरोध केला. त्यांना कोल्हापूर बंदी घालण्यात आली. पण नंतर राष्ट्रवादीने सौम्य भूमिका घेत त्यांना विरोध न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दौऱ्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची खात्री झाल्यानंतर प्रशासनाने त्यांच्यावरील कोल्हापूर प्रवेश बंदी उठवली.

कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर सोमय्या म्हणाले, ‘ठाकरे सरकारने भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र ही मोहीम सुरू केली आहे. त्यांचे सर्व घोटाळे आम्ही उघडकीस आणणार आहोत. वर्षभरात दोन डझन घोटाळे बाहेर काढले असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. येत्या चार महिन्यांत महाराष्ट्राचे निम्मे मंत्रिमंडळ गायब होईल, नाहीतर दवाखान्यात असेल,’ असा इशाराही त्यांनी दिला.

Team Global News Marathi: