महाराष्ट्रातील 48 जागांमधून या आठ महिला जाणार संसदेत

मुंबई | लोकसभा निवडणुकांचा निकाल पूर्णपणे स्पष्ट झालेला आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यातील एकूण 48 खासदार संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यापैकी केवळ 8 महिला खासदार या संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैंकी भाजपा 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 1, एआयएम 1 आणि अपक्ष 1 जागेवर विजय मिळवला आहे. या 48 उमेदवारांमध्ये 8 महिला या संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना दिसतील. भाजपाने राज्यात 7 महिलांना उमेदवारी दिली तसेच काँग्रेसने 3, राष्ट्रवादीने 1, तर शिवसेनेन 1 महिलेलाच तिकीट दिलं होते. यापैकी आठ महिला या निवडणून आल्या आहेत.

कोण आहेत या 8 महिला?

  1. सुप्रिया सुळे,(राष्ट्रवादी काँग्रेस) : बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजपाच्या कांचन कूल यांना पराभूत केले.
  2. पूनम महाजन,(भाजपा) : उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला.
  3. डॉ. प्रीतम मुंडे,(भाजपा) : बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम गोपिनाथ मुंडे यांनी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांना पराभवाची धूळ चारली.
  4. डॉ. हिना गावित,(भाजपा) : नंदूरबारमधील भाजपच्या उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार ऍड. के सी पाडवी यांच्यावर 95 हजार मतांनी विजय मिळवला.
  5. रक्षा खडसे, (भाजपा) : रावेर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार रक्षा निखिल खडसे यांनी काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांचा पराभव केला.
  6. नवनीत कौर राणा,(अपक्ष) : अमरावतीत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला.
  7. भावना गवळी,(शिवसेना) : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना पुंडलिकराव गवळी यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना पराभूत केले.
  8. भारती पवार,(भाजपा) : दिंडोरी मतदार संघातून भाजपाच्या डॉ. भारती प्रवीण पवार यांनी काँग्रेसच्या धनराज महाले यांना हरवले
admin: