नारायण राणे पुनः काँग्रेसच्या वाटेवर ?

मुंबई |  संपूर्ण देशासह महाराष्ट्रात काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसला कुणी वाचवणारं आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत माजी काँग्रेस नेते आणि भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे बंडखोर नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विधीमंडळात आक्रमक नेत्याची कमी जाणवणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात राणे नावाचं मोठं प्रस्थ आहे आणि त्यांच्या पाठिशी मोठा अनुभव आहे. काँग्रेसला या परिस्थितीतून राणे बाहेर काढू शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

नारायण राणे जर पुन्हा काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन  काँग्रेस मोठं आश्वासन देण्याची शक्यता आहे.

admin: