महाराष्ट्रातील भाजपच्या या जेष्ठ नेत्याने उधळले रंग – 30 वर्षीय तरुणीला घेऊन पलायन

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकाने उधळले रंग; ३० वर्षीय तरुणीला घेऊन केले पलायन

पिंपरी चिंचवड: भोसरी विधानसभा मतदारसंघातील एका भाजप ज्येष्ठ नगरसेवकाने परप्रांतीय तरुणीला घेवून पलायन केले आहे. या नगरसेवकाने पत्नीला नोटीस पाठवून घटस्फ़ोट देण्यास सांगितले आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकाच्या पत्नीने याबाबत भाजपचे आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडे तोंडी तक्रार केली असून नगरसेवक पदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केल्याची चर्चा सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सदस्य असलेल्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने तरुणांना लाजवेल असे अक्षम्य कृत्य केले आहे. दिघी परिसरात राहणा-या 30 वर्षीय तरुणीला घेऊन महानायकायने पोबारा केल्याची चर्चा सुरु आहे.

संबंधित नगरसेवकाने त्या तरुणीसाठी आपल्या पत्नीसह मुला-मुलीला सोडण्याची तयारी केली आहे. वकीलामार्फत पत्नीला नोटीस पाठवून घटस्फ़ोट देण्यास सांगितले आहे. तर मुलाच्या नावे केलेले घर पुन्हा स्वतःच्या नावे करण्याचा तगादा लावला आहे.

संबंधित नगरसेवकांबाबत पत्नीने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचेकडे तक्रार केली आहे. त्यांना समजावून सांगण्याची विनंती केली आहे. अथवा त्यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. परंतु, त्या नगरसेवकाने नेत्यासह सहका-याविषयी अपशब्द वापरले असल्याने या प्रकरणात आपण लक्ष घालणार नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीनंतर अनधिकृत बांधकाम प्रश्नी संबंधित नगरसेवक अडचणीत आला होता. प्रशासनाने नोटीस देखील बजावली होती. माञ, राजकीय दबावपोटी नगरसेवक पद रद्द करण्यास महापालिका आयुक्तांनी कारवाई टाळली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: