मुंबईः एक धक्कादायक बातमी समोर येतेय. जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. त्यातच आता भारतातही या व्हायरसचा धोका वाढताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. गेल्या काही तासांमध्ये मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे नवे रुग्ण समोर आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 324 वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात 24 तासात कोरोना रुग्णांचा आकडा 74 झाला आहे.
मुंबईत 6 तर पुण्यात 4 असे 10 नवीन रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. महाराष्ट्रात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा कोरोनाचा दुसरा बळी ठरला आहे. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण आहे.
गेल्या 24 तासात राज्यात 10 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात 6 मुंबईचे आणि 4 पुण्यातील रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा हा 25 वर पोहोचला आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
भारतात कोरोना व्हायरस वेगाने पसरतो आहे. शनिवारी फक्त 24 तासांत तब्बल 98 रुग्ण आढळले होते. आता यामध्ये आणखी रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 324वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 74 रुग्ण आहेत.
शुक्रवारी कोरोना व्हायरसच 50 रुग्ण आढळले होते. तर शनिवारी तब्बल 98 रुग्ण आढळले. फक्त 24 तासांतच रुग्णाची संख्या दुप्पट झाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 22 रुग्ण बरे झालेत, तर आता मृतांची संख्या 5 वर गेली आहे.
कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
पिंपरी चिंचवड- 12
पुणे – 11
मुंबई – 19
नागपूर- 4
यवतमाळ – 4
कल्याण – 4
नवी मुंबई- 3
अहमदनगर- 2
पनवेल- 1
ठाणे -1
औरंगाबाद- 1
रत्नागिरी – 1
उल्हासनगर- 1
एकूण 74
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
पुण्यातील दाम्पत्य (2)- 9 मार्च
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)- 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)- 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबईत (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई महिला (1) – 19 मार्च
उल्हासनगर महिला (1) -19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
मुंबई (2) – 20 मार्च
पुणे (1) – 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) – 21 मार्च
मुंबई (8) – 21 मार्च
यवतमाळ (1) – 21 मार्च
कल्याण (1) – 21 मार्च
मुंबई (6) – 22 मार्च
पुणे (4) – 22 मार्च
एकूण – 74 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
महाराष्ट्र – 56 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1)- 22 मार्च