महाराष्टात 11वाजेपर्यंत सरासरी 7 टक्के मतदान मातब्बर उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे: आज देशभरात लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरातील 15 राज्यातील 117 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांमध्ये आज मदतान होत आहे. अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे, रावसाहेब दानवे, पुण्यातीच आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, खासदार संजय महाडीक, गुलाबराव देवकर,संजय शिंदे, सुजय विखे, गणपतराव देशमुख, विजयसिंह मोहिते पाटील, उदयनराजे भोसले ,एकनाथ खडसे, यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

#लोकशाहीमहोत्सव
मतदान केल्यानेच लोकशाही बळकट होते . आज सकाळी भोकरदन येथे कुटुंबियांसोबत जाऊन  मतदानाचा हक्क बजावला.आपण सुद्धा घराच्या बाहेर पडून मतदान करून  लोकशाहीचे हात बळकट करा.
रावसाहेब दानवे पाटील

सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा अधिकार

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामती येथील रिमांड होम या मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं. त्यांच्यासह आई प्रतिभा पवार,भाऊ रणजित पवार आणि शुभांगी पवार या कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला.

अजित पवारांनी केले मतदान

सर्वात महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेच्या मतदारसंघ असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये देखील आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता काटेवाडी या मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. याशिवाय त्यांच्या आई आशाताई पवार आणि सुनेत्रा पवार यांनीदेखील आपल्या कुटुंबीयांसह येऊन काटेवाडी मतदान केंद्रावर मतदान केलेले आहे

स्लग उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील अनंत हायस्कूलमध्ये सहपरिपारा सह बरोबर मतदानाचा हक्क बजावला आहे. उदयनराजे भोसले यांनी लोकसाही टिकवण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. असे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांनी निमगाव येथे केले मतदान

राष्ट्रवादीचे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे व त्यांचे बंधू माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी निमगाव येथे मतदान केले. त्यांनी यावेळी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. माढा लोकसभा मतदार संघात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माढा तालुक्यातील निमगाव येथील संवेदनशील असलेल्या निमगाव येथे केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय स्थानिक पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे.

 ‼लोकसभा निवडणूक २०१९ (तिसरा टप्पा)

*⭕सकाळी 10 वाजेपर्यंत कुठे किती मतदान?*

🔹रावेर 7.19 %

🔹जालना 9.23 %

🔹औरंगाबाद 8.20 %

🔹रायगड 7.17 %

🔹पुणे 8.71 %

🔹बारामती 6.01 %

🔹अहमदनगर 3.97 %

🔹माढा 6.52 %

🔹सांगली 6.69 %

🔹सातारा 6.81 %

🔹रत्नागिरी 3.46 %

🔹कोल्हापूर 6.80 %

🔹हातकंगणले 7.06 %

admin: