बारामतीत राष्ट्रवादी हरली तर राजकारण सोडून देईन-अजित पवार

बारामती: महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते बारामतीत तळ ठोकून आहेत. बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना विजयी करण्यासाठी भाजपा नेत्यांनी कंबर कसली आहे. मात्र, काहीही झाल तरी बारामतीमध्ये राष्ट्रवादीच जिंकनार असा विश्वास अजित पवार यांनी बोलून दाखवला.

मी आमदारकीसाठी उभा राहिलो, त्यावेळी मोदींनी बारामतीत सभा घेतली, जवळ-जवळ पाऊणलाख लोकं त्यांच्या सभेला हजर होती. तरीही, मी 1 लाख मतांनी निवडून आलो, असेही अजित पवार यांनी म्हटले. त्यामुळे, बारामतीत भाजपा जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, पण जर भाजपा हरली तर भाजपाने राजकारण सोडून द्यावं, असे चॅलेंजही अजित पवार यांनी केलंय.
अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी सपत्नीक बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना, भाजपाने बारामती जिंकल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन, असे अजित पवार म्हणाले.

admin: