महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा एकदा थेट साधला शरद पवारांवर निशाणा ,म्हणाले..

सांगली। लोकसभा निवडणुकीत शरद पवाराना जेरीस आणून त्यांना तिथेच अडकवून पिंगा घालायला लावला असे खळबळजनक वक्तव्य भाजपाचे जेष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ते सांगलीच्या कवठेपिराण गावात हिंद केसरी पै. मारुती माने यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात बोलत होते.

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधत, शरद पवारांचे आम्ही सर्व बालेकिल्ले उद्धवस्त केले असून लोकसभा निवडणुकीत शरद पवाराना जेरीस आणले. ते थोडक्यात वाचले असे म्हणत विधानसभेला देखील असाच पिंगा घालायला लावू असे सूचक वक्तव्य यावेळी केले.

यावेळी भाजपा सेना युतीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भाजपा सेनेची युती अभेद्यच राहणार असल्याचे सांगून एखादा नेता सेनेतून भाजपात आला तर सेना नेत्यांनी वाईट वाटून घेऊन नये. कारण ताटात काय आणि वाटीत काय सारखेच असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सेना नेत्यांना चिंमटा काढला.

यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आदर्श सरपंच भीमराव माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

admin: