मला काँग्रेसकडून अपेक्षा नाही, पण शरद पवारांचे कळत नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी-मोदी

अहमदनगर:  काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोटाळे आणि अजित पवारांचे लाज वाटणारे वक्तव्य, ही विरोधकांची ओळख इतिहास साक्षी आहे, भारतात स्वराजाची संकल्पना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवली जो पैसा मध्य प्रदेश सरकारला कुपोषण निर्मुलनासाठी दिला, तोच पैसा काँग्रेस निवडणुकीसाठी वापरत आहे काँग्रेस हटाव, तरच देश पुढे जाईल असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर मध्ये प्रचार सभेत बोलताना केला.
ते नगरचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, पुन्हा सत्तेत आल्यानंतर स्वतंत्र जलमंत्रालय स्थापन करणार लहान शेतकऱ्यांना नियमित पेन्शन देण्याचा संकल्प आहे    पशू-पालन करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास आम्ही सुरु केलंय ,ऊस शेतकऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्ड देण्याचा प्रयत्न आहे   गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील लाखो-कोट्यवधी गरिबांना पक्की घरं मिळाली, पक्की शौचालयं मिळाली

देश सुरक्षित राहिला, तर देशातील नागरिकांचे हित सुरक्षित राहील.
,छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून असून देखील तुम्हाला हे सगळे ऐकून झोप कशी येते? काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर तुम्ही देखील परदेशी चष्म्यातून पाहात आहात जम्म-कश्मीरला हिंदुस्थानपासून वेगळ करण्याचा काँग्रेसचा प्र
प्रयत्न आहे असा आरोप ही त्यांनी केला. दहशतवाद्यांना पाताळातून शोधून काढून कारवाई करणारे हे सरकार आहे असेही ते म्हणाले.

                  मोदी उवाच

दहशतवाद्यांना मूंह तोड जबाब देणारे हे सरकार आहे

आघाडीच्या काळात बॉम्बस्फोटात कोण मरत होता

आघाडीच्या पोकळ घोषणा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एनडीएचे मजबूत निश्चय असलेले सरकार

शरद पवार, तुम्हाला देशात दोन पंतप्रधानांचा मुद्दा मान्य आहे? काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल?

जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करु, असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी उभे आहेत

admin: