मराठा तरुणांचं 27 दिवसांपासून आंदोलन, तरीही याकडे लक्ष नाही हे दुर्देवी – देवेंद्र फडणवीस

मुंबई । मराठा समाजाच्या तरुणांचं गेल्या 27 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र, अजूनही तरुणांना नियुक्त्या न मिळणं हे दुर्देवी आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. सकल मराठा समाज पुरस्कृत एसईबीसी आणि ईएसबीसी उमेदवारांचं आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. नियुक्त्यांवर वरिष्टांशी चर्चा केल्यानंतर आम्ही कलम 18 समावेश केला.

सगळ्यांना नियुक्त्या मिळाव्यात यासाठी हा कायदा केला आहे. हा कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरवला, सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली नाही. कलमा अंतर्गत नियुक्त्या देता येतात, सरकार का घाबरतंय. कायदा वैध, तर कारवाई अवैध्य कशी. असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे. यापुर्वीही आझाद मैदानावर मराठा समाजाची आंदोलनं झाली, आम्ही बसू दिलं नाही. मात्र 27 दिवस झालं तरीही याकडे लक्ष नाही हे दुर्देवी आहे अस मत यावेळी फडणवीस यांनी मांडले.

मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 मधील कलम 18 नुसार मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी हे तरुण आंदोलनाला बसले आहेत.

दरम्यान, प्रविण दरेकर यांनीदेखील यावेळी राज्य सरकारवर टीका केली. “मराठा तरुणांच्या समस्या ऐकायला ठाकरे सरकारला वेळ नाही. सरकार पोकळ आणि बहिरं आहे. या सरकारला मराठा समाजाप्रती आस्था नाही. मराठा भावनांचा उद्रेक होऊ शकतो. मराठा समाजाला आरक्षण नाही. सरकार ऐकत नाही. सरकारने केसाने गळा कापला”, असा टोला दरेकर यांनी लगावला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि नितेश राणे यांनी आझाद मैदान येथे जाऊन आज मराठा आंदोलकांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: