साबरमती आश्रमाच्या व्हिजिटर बुकमध्ये ट्रम्प यांनी काय लिहिले?

गांधीनगर | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांचे भारतात आगमन झाले. मोठ्या जल्लोषात त्यांनी स्वागत करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनरसोबत भारत दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्याच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी अहमदाबादमधील साबरमती आश्रमला भेट दिली. या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आश्रमातील व्हिजीटर्स बूकमध्ये संदेश लिहिला आहे.

या व्हिजीटर्स बुकमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, To My Great Friend Prime Minister Narendra Modi Thank You For This Wonderful Visit म्हणजेच ‘माझ्या महान मित्रा पंतप्रधान मोदी या सुंदर भेटीसाठी आभार’ असा याचा अर्थ आहे. यासोबतच त्यांनी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया यांनी चरखा चालवला

ग्लोबल न्युज नेटवर्क: