मराठा आरक्षणप्रकरणी विनोद पाटील यांच्याकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

मुंबई । मराठा आरक्षणप्रकरणी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवत ऐतिहासिक निकाल दिला होता. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. यादृष्टीने याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात तातडीने धाव घेतली असून मराठा आरक्षणाच्या निकालाला कायदेशीर कवच मिळावे या हेतूने कॅव्हेट दाखल केले आहे.

कॅव्हेट दाखल केल्यामुळे सुप्रीम कोर्ट कोणताही निर्णय देण्यापूर्वी याचिकाकर्त्यांची बाजू पूर्ण ऐकून घेईल. मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर आरक्षणविरोधक अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे गुरुवारीच स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर आरक्षण समर्थक विनोद पाटील तातडीने हालचाल करत कॅव्हेट दाखल केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: